Image

कपाशीची लागवड : जास्तीत जास्त पीक कसे घ्यावे?

या वैविध्यपूर्ण परिस्थितीमुळे, कपाशीच्या उत्पादनात सातत्यपूर्ण वाढ होणे, हे एक मोठेच आव्हान आहे.

कपाशीच्या लागवड आणि पीकात वाढ करण्यासाठी खालील मुद्दे महत्त्वाची भूमिका बजावतात.

  • जमिनीची तयारी
  • योग्य हायब्रीड वाणाची निवड
  • योग्य अंतर
  • रोपाची कमाल घनता (ओपीडी)
  • तण व्यवस्थापन
  • पोषणमूल्यांचे व्यवस्थापन
  • किड आणि रोगांचे व्यवस्थापन

जमिनीची तयारी

सखोल नांगरणी करून, शेतजमीन पेरणीसाठी तयार केली जाते. त्यानंतर, मान्सून सुरू होण्यापूर्वी, नियमितपणे माती वरखाली करत राहायला हवी. जमीन तयार करत असताना, सेंद्रीय खतांचा एक थर मातीचा पोत सुधारण्यासाठी, मातीत हवा खेळती राहण्यासाठी, पोषणमूल्यांचे शोषण योग्य रितीने होण्यासाठी, उपयोगी सूक्ष्मजीवांच्या संख्येत वाढ आणि ऑर्गेनिक कार्बनची टक्केवारी सुधारते. यामुळे, एकूणातच मातीचे आरोग्य सुधारते.

योग्य हायब्रीड वाणाची निवड

पेराल ते उगवेल, या सुत्रानुसार कपाशीचे हायब्रीड वाण बियाण्याची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. संपूर्ण हंगाम आणि लागवड यावर अवलंबून राहते. म्हणून, कपाशीचे हायब्रिड वाणाची निवड करताना, पेरणीच्यावेळी खालील मुद्दे विचाराधीन असायला हवेत.

  • १. मातीचा प्रकार : विविध प्रकारच्या मातीत कपाशीचे उत्पादन घेतले जाते. त्यात, मध्यम ते उच्च दर्जाच्या काळ्या मातीचा समावेश होतो. पाण्याचा निचरा होणारी आणि लाल मातीचाही समावेश होता. सामान्यत: कपाशीच्या लागवडीसाठी काळी माती असण्याला प्राधान्य दिले जाते. याचे कारण असे की, पीकाला जास्तीत जास्त ओलावा धरून ठेवणारी माती हवी असते आणि काळ्या मातीची ओलावा धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते.
  • २. पावसाच्या पाण्याची जमीन आणि सिंचन : अंकुरणापासून, स्क्वेअर इनिशिएशन, फुलावर येणे आणि बोंड धरणे – बोंडाचा विकास हे टप्पे आहेत. या गुंतागुंतीच्या टप्प्यांमध्ये सिंचनाची व्यवस्था असायला हवी जेणेकरून ओलाव्याचा ताण सहन न होऊन, पीकावर कोणताही विपरीत परिणाम टाळता येतो.
  • ३. पीकाचा कालावधी : व्यावसायिकदृष्ट्या कपाशीच्या हायब्रीड वाणाचे तीन प्रकार बाजारपेठेत उपलब्ध आहे. लघू कालावधीसाठी (१४०-१४० दिवस), मध्यम कालावधी (१६०-१७० दिवस) आणि दीर्घ कालावधीसाठी (१८० दिवसांवर) असे प्रकार आहेत. दरम्यान, अलिकडे वाढीदरम्यान गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव बघता, दीर्घावधीसाठी हायब्रीड वाण टाळायला हवे.

योग्य अंतर

विविध अंतरावर लावलेल्या कपाशीच्या रोपांमध्ये स्वत:हून स्थिरावण्याची जबरदस्त क्षमता असते. ही एक अतिशय गुंतागुंतीची आणि कठीण प्रक्रीया असून, ती थेट शेतजमिनीतील कपाशीची रोपे नेमकी किती असावी? याची संख्या निर्धारीत करते.

पावसाळी स्थिती

मातीचा प्रकार अंतर एकरी रोपांची संख्या
मध्यम १२० – ३० सेंमी १०,८९०
मध्यम ते उच्च १२०-४५ सेंमी ७,२६०

संरक्षणात्मक सिंचन परिस्थिती

मातीचा प्रकार अंतर एकरी रोपांची संख्या
मध्यम ते उच्च १२०-४५ सेंमी ७,२६०
उच्च १२०-६० सेंमी ५,४४५

रोपांची कमाल घनता

पाश्चिमात्त्य देशांमध्ये रोपांची कमाल घनता (ओपीडी) ही संकल्पना आधीपासूनच कार्यरत आहे पण, भारतात हे अजूनही प्रयोगात्मक पातळीवर आहे. निरिक्षणात अशा नोंदी करण्यात आल्या आहेत की, ओपीडी अंतर्गत कपाशीची लागवड हा उत्पादकता वाढविण्यासाठी विशेषत: पावसाच्या पाण्याखाली येणाऱ्या क्षेत्रात प्रति एकर रोपांची संख्या वाढविण्यासाठी लाभदायक ठरते. लागवडीसाठी कमीत कमी खर्च करून, जास्तीत जास्त ओलावा वापरण्यासाठी, हा पर्याय लाभदायक ठरतो. ओपीडी कपाशीच्या प्रकारात, प्रत्येक रोपावर पारंपरिक पद्धतीने झाडावर धरत असलेल्या बोंडांपेक्षा कमी कपाशीची बोंडे लागतात पण, एकूणात प्रती एकरवर बोंडांची संख्या जास्त असते. ओपीडीमुळे तणवाढीची स्पर्धाही कमी होते आणि चांगला प्रकाश तसेच, लवकरच बोंडे धरण्याची प्रक्रीया गतीने होते. नियमित पीक व्यवस्थापनाशिवाय, ओपीडीमध्ये कनोपी व्यवस्थापन योग्य टप्प्यावर होणे, आवश्यक आहे. लिकोसिन किंवा चमत्कार यासारख्या विकासकांचा वापर तेव्हा करावा जेव्हा झाडाची उंची ४ ते साडे चार फूट होते आणि अन्य १५ दिवसांचा मध्यंतर, अतिरिक्त रोपांची वाढ नियंत्रित करण्यास मदत करतो.

ओपीडी पद्धतीने पेरणी करण्यासाठी हायब्रीड वाणाची निवड फारच महत्त्वपूर्ण असते. हायब्रिडमुळे उंच, ताठ वाढ होऊन पानांची किमान जागा आणि सुरुवातीच्या काळातच बोंडे धरण्याची क्षमता असलेले बियाणे वापरणे फायद्याचे ठरते. अंकुर बियाण्यांच्या वतीने अंकुर ३०२८ बीजी२, अंकुर जय बीजी२, अंकुर पुष्कर बीजी २ आणि अंकुर किर्ती बीजी २ या बियाण्यांचा वापर ओपीडी पद्धतीने पेरणी करताना करण्याची शिफारस करण्यात येते.

म्हणून, कपाशीच्या क्षेत्रात ओपीडीचा स्विकार करताना, योग्य त्या हायब्रिड बियाण्याची निवड, खतांचा योग्य वापर आणि वेळेनुसार कनोपीचे व्यवस्थापन करावे. या उपायांमुळे कपाशीचे उत्पादन वाढविण्यास मदत होईल.

कोरडवाहू जमिनीवर ओपीडी तंत्रज्ञानानुसार रोपांमध्ये अंतर ठेवताना खालील बाबींचा समावेश करावा.

ओलिताची परिस्थिती

मातीचा प्रकार अंतर प्रति एकर झाडांची संख्या
हलक्या ते मध्यम ९०-३० सेंमी १४,५२०
मध्यम ते उच्च १२०-३० सेंमी १०,८९०

तण व्यवस्थापन

दोन्ही प्रकारचे म्हणजे गवतसदृश आणि लांब-पसरट पानांचे तण, पाण्यासाठी, प्रकाश आणि पोषणमूल्यांसाठी कपाशीच्या रोपासोबत स्पर्धा करतात. सुरुवातीच्या ६० दिवसांमध्ये जेव्हा रोपांची कनोपी विकसित झालेली नसते तेव्हा तण नियंत्रण सर्वाधिक महत्त्वाचे असते कारण, तण मुख्य पीकाशी अगदी जोरकसपणे स्पर्धा करीत असते. तण व्यवस्थापन करण्यासाठी हाताने तण उपटून काढणे, उपटणे आणि तणनाशकांचा उपयोग करता येऊ शकतो.

पोषणमूल्यांचे समावेशक व्यवस्थापन

आतापर्यंत हे सिद्ध झाले आहे की, समावेशक पोषणमूल्ये व्यवस्थापन अर्थात आयएनएम हे सूक्ष्म पोषणमूल्यांचा आणि सेंद्रीय क्षमतांच्या खतांचा संतुलित वापर करणे हे, पीकांसाठी तर चांगलेच असते पण, त्याने मातीचे आयोग्यदेखील चांगले होते. अंकुरच्या शेतीत करण्यात आलेल्या संशोधनानंतर खालील शिफारशी करण्यात आल्या आहेत.

ओलिताच्या स्थितीत पोषणमूल्यांचे व्यवस्थापन (प्रति एकर प्रमाण)

नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम
६० किलो ३० किलो ५० किलो

खत/सूक्ष्म पोषणमूल्य प्रमाण/मात्रा वेळ
१०:२६:२६ ११५ किलो पेरणीच्या १५-२० दिवसांनंतर
युरीया ४० किलो
अंकुर वसुंधरा १० किलो
अंकुर एच-अल्टीमेट २ किलो
युरीया ६५ किलो पेरणीनंतर ३५ ते ४० दिवसांनी
अंकुर कालबूम १० किलो
अंकुर फास्ट ५ किलो
अंकुर झायमो ग्रॅन्युअल्स ६ किलो
पोटॅश ३५ किलो
अंकुर मॅग्नेशियम सल्फेट १० किलो १० किलो पेरणीनंतर ७० ते ८० दिवसांनी

संरक्षित सिंचनव्यवस्था परिस्थितीत (एकरी मात्रा) पोषणमूल्यांचे व्यवस्थापन

नायट्रोजन फॉस्फोरस पोटॅशियम
६० किलो ३० किलो ५० किलो

खत/सूक्ष्म पोषणमूल्य प्रमाण/मात्रा वेळ
१०:२६:२६ १५० किलो पेरणीच्या १५-२० दिवसांनंतर
युरीया ५० किलो
अंकुर वसुंधरा १० किलो
अंकुर एच-अल्टीमेट ४ किलो
युरीया ५० किलो पेरणीनंतर ३५ ते ४० दिवसांनी
अंकुर कालबूम १० किलो
अंकुर फास्ट ५ किलो
अंकुर झायमो ग्रॅन्युअल्स ६ किलो
युरीया ४० किलो पेरणीनंतर ७० ते ८० दिवसांनी
अंकुर वसुंधरा ५ किलो
अंकुर कालबूम ५ किलो
अंकुर मॅग्नेशियम सल्फेट १० किलो

किड आणि रोगांचे व्यवस्थापन

बीटी कॉटन येण्यापूर्वी बोंडअळी हा शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक चिंतेचा विषय होता. पण, आता शोषून घेणारे संयुक्त किट आणि अलिकडच्या २ ते ३ वर्षातील पीबीडब्ल्यू हे कपाशीच्या शेतकऱ्यांसाठी काळजीचा विषय ठरले आहे.गुलाबी बोंड अळी सर्वसमावेशक किड व्यवस्थापनातून नियंत्रणात आणली जाऊ शकते ज्यामध्ये प्रतिबंधात्मक उपाय (उन्हाळ्यात खांलवर नांगरणी, निर्वासित बियाण्यांचा वापर), भौतिक किंवा यंत्रणेच्या माध्यमातून उपाययोजना (संसर्ग झालेल्या चौकटी आणि बोंडांना नष्ट करणे, प्रकाशाचा आणि फेरोमन ट्रॅपचा वापर), जैवशास्त्रीय उपाययोजना (ट्रायकोग्रामा कल्चर, कडूलिंबाच्या तेलाची फवारणी) आणि रासायनिक उपाययोजना (गॅस आणि संपर्कातील किटनाशके)

शोषण करणाऱ्या महत्त्वाच्या किडींमध्ये अफिड, जस्सीड, थ्रिप्स आणि पांढऱ्या माशा तर महत्त्वाचे रोग म्हणजे पानांवर डाग पडणे, अँथ्राक्नोस, भुकटीसदृश मिलड्यू आणि राखाडी मिलड्यूचा समावेश आहे. किड आणि रोगांवर कृषी विद्यापीठे/कृषी विभागाच्या वतीने, जारी करण्यात आलेल्या शिफारशींनुसार नियंत्रण मिळविता येते.