Image

धानाच्या पिकात इतर वाणांकडून हायब्रिड पिकांकडे जाण्याची गरज

भारतात धानपिकासाठी वापरण्यात येणाऱ्या पीकांमध्ये अनेक प्रकार आहेत. त्यात पांढऱ्या तांदूळापासून, पारबॉईल्ड धान, चिकट तांदूळ, लाल तांदूळ, काळा तांदूळ इथपासून ते बासमती, जसमिन धान आणि इतर अनेक प्रकारांचा त्यात समावेश होतो. देशभरातील विविध धानाच्या शेतांमध्ये विविध प्रकार सहजपणे बघायला मिळतात. धान्याच्या दाण्यांच्या आकारात, उत्पादनात आणि प्रमाणात फरक असतो. या सर्व प्रकारांवरून आणि शेतातील धान्य बियाणे म्हणून साठवून ठेवण्याच्या पुढचा टप्पा गाठावा लागणार आहे. आता वेळ आली आहे ती, हायब्रीड वाण वापरण्याची ! यामुळे, उत्पादनात वाढ होईल आणि जास्त पीक मिळेल जेणेकरून, देशाच्या सतत वाढत असलेल्या लोकसंख्येच्या मागणीनुसार पुरवठा करता येईल.

पुढे वाचा
Image

कपाशीची लागवड : जास्तीत जास्त पीक कसे घ्यावे?

भूगर्भशास्त्र, मातीचा प्रकार, कृषी वातावरणीय परिस्थिती, पीकपद्धती, पीकांचा कालावधी, शेतीची पद्धत, प्रकार आणि पीकउत्पादन या सगळ्याच बाबींनुसार, भारताचे तीन प्रमुख भागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. उत्तर विभाग (पंजाब, हरियाणा आणि राजस्थान), मध्य विभाग (महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश) आणि दक्षिण विभाग (तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू) हे तीन भाग आहेत. भारतात जवळपास ६५ टक्के कपाशीच्या पीकाची लागवड ही पावसाच्या क्षेत्रात आणि मातीच्या विविध प्रकारांमध्ये करण्यात येते. त्यापैकी, बहुतांश पीक लागवड मध्यम ते उच्च दर्जाच्या काळ्या मातीत केली जाते.

पुढे वाचा